नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नरतवडे येथील ७३ वर्षीय श्रीपती भोसले यास अटक
राधानगरी / विजय बकरे
नरतवडे :- नरतवडे (ता. राधानगरी) येथील श्रीपती भोसले याने नऊ वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली
याबाबत अधिक माहिती अशी की नरतवडे येथील श्रद्धा कोचिंग क्लासेस या खाजगी क्लास मधील नऊ वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर श्रीपती रामचंद्र भोसले ( वय वर्षे ७३) यांनी तिला जवळ घेऊन मिठी मारून तिच्या छातीला व पोटाला हात लावून तिचा मुक्का घेऊन तिला याबाबत कुणाला काही सांगितलीस तर तुला शपथ आहे. तुझे आजोबा, आजी, भाऊ, तुझे आई, वडील, घरातील मरतील अशी धमकी दिली होती. याबाबतची फिर्याद राधानगरी पोलीस स्टेशनला दाखल होताच नरतवडे येथील श्रीपती रामचंद्र भोसले (वय वर्ष ७३) यास पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली आहे. अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक- प्रणाली पवार ह्या करीत आहेत.