कोल्हापूर युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
शहर पदाधिकारी आढावा बैठक संपन्न
कोल्हापूर युवासेना, युवतीसेना शहर पदाधिकारी
यांची आज शासकीय विश्रामगृहीत इथे आढावा बैठक संपन्न झाली..
कोल्हापुरातल्या तरुणांचेअनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी
व्यसनाधीनतेच्याच्या विळाख्यात अडकलेली तरुणाई बाजूला करण्यासाठी, आणि कोल्हापूरच्या युवक युवतींना सक्षम करण्यासाठी कोल्हापूर युवा सेना नेहमी कटिबद्ध राहील
अशा पद्धतीची भावना सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली... येणाऱ्या महापालिकेच्या दृष्टीने
युवा सेनेचे पदाधिकारी 81 वार्ड मध्ये पुन्हा नव्याने बांधणी करून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना हे नाव प्रत्येकाच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न करतील
हा निश्चय सर्वांनी केला. यावेळी शाखांची बांधनी पदाधिकाऱ्यांची नेमणूक, युवा सेनेची नोंदणी
अशा उपक्रमांवर भर देण्यासाठी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी सर्वांना सूचना दिल्या.
यावेळी योगेंद्र माने, चैतन्य देशपांडे, बंडा लोंढे, कनिष्क शिंदे, कीर्ती कुमार जाधव, शुभम पाटील, विनय शिरसागर, माधुरी जाधव, प्रिया माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या आढावा बैठक साठी युवासेनेचे राजर्षी मिणचेकर, प्रज्ञा लोणारे, अक्षय घाटगे, अभिषेक दाबाडे,निलेश सूर्यवंशी,सुमीत मेळवंकि,सानिका दामूगडे,सार्थक कोलेकर,प्रथमेश रांगणे, सिद्धी दामूगडे,मुन्ना महात,अक्षय मोरे, आकाश शिंदे.. आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते..