इचलकरंजी : येथील पोलिस मित्र असोसिएशनच्या महिला राज्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्यां डॉ रजनीताई शिंदे यांना श्री दत्त दिव्यांग अँड निराधार संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष पाटील (अध्यक्ष- रोटरी क्लब इचलकरंजी) व चंद्रकांत मगदूम (सेक्रेटरी रोटरी क्लब)यांच्या हस्ते व नेताजी पवार, प्रशांत गुरव, मुख्याध्यापक अशोक पाटील यांच्या उपस्थितीत "आदर्श समाज रत्न"पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ रजनीताई शिंदे यांनी राज्यात सर्वात पहिल्यांदा"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या शासनाची योजना पोलिस मित्र असोसिएशनच्या वतीने राबवित 2 हजाराहून अधिक महिलांचे नोंदणी फॉर्म भरून एक आदर्श निर्माण केला आहे. रजनीताई शिंदे या गेली सोळा ते सतरा वर्षे झाली महिलांसाठी अहोरात्र अविरतपणे कार्यरत आहेत.महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत.गरजू, गोर-गरीब महिलांच्या कौटुंबिक अडचणी लक्षात घेऊन छोट्या छोट्या व्यवसायासाठी कर्ज प्रकरणे मंजूर करून दिली.शैक्षणिक अडचणी जाणून घेत अनेक विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य दिले. मुलींना 10 वी,12 वी नंतर पुढे काय करावे यासाठी अनेक महिला अधिकाऱ्यांच्याकडून मोफत मार्गदर्शनपर शिबीर आयोजित केले.अनेक ठिकाणी महिला बचत गटांना स्टॉल उभा करून देत व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिल्या.महिला सबलीकरणासाठी व्यावसायिक नामांकित महिला उद्योजिका यांचे मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन केले. महिला सक्षमीकरणासाठी महिला पोलिस अधिकारी,महिला वकील,कायदेशीर महिला सल्लागार यांचे मार्गदर्शन घेत महिलांसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. अनुसूचित जाती,जमाती व इतर भटक्या विमुक्त जाती, अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी अनेक शासकीय योजना राबविल्या.गरोदर महिला,नवजात शिशु ते जेष्ठ नागरिकांसाठी अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. मोफत डोळे तपासणी व उत्तम प्रतीचा चष्मा अनेक गरजू नागरिकांना देत एक आदर्शवत कार्याची पोच पावती जनतेने दिली. *2019 व 2021 तसेच आत्ताच्या 2024च्या महापुरात पूरग्रस्तांसाठी मोफत जेवण, जीवनावश्यक वस्तू, संसारोपयोगी साहित्य यांचे वाटप केले.कोरोना सारख्या महाभयंकर महामारीमध्ये मास्क,सॅनिटाईझर व औषधांचे वाटप करत महिलां वर्गासोबत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.अलीकडे महाराष्ट्र शासनाने "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना " जाहीर केली व त्याचा जीआर काढला असता डॉ रजनीताई शिंदे यांनी पोलिस मित्र असोसिएशनच्या माध्यमातून 3 दिवसीय कॅम्प आयोजित करून जवळपास 2 हजारहून अधिक महिलांचे फॉर्म भरून घेतले.डॉ रजनीताई शिंदे यांच्या महिलांसाठी असणारी तळमळ आणि सामाजिक कार्याची दखल घेत फ्रान्सच्या युनिक कौन्सिल ऑफ युनिव्हर्सिटीतर्फे *डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क" ही मानद पदवी देऊन खरोखरीच एका महिलांसाठी व समाजासाठी अहोरात्र अविरतपणे कार्यरत असलेल्या सर्व सामन्यातील असामान्य व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला असल्याची प्रतिक्रिया जनतेतून मिळाली. डॉ रजनीताई शिंदे यांनी महिलांचे व्यासपीठ म्हणून वेध फौंडेशनची स्थापना केली संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करत असताना यामध्ये जवळपास अडीच हजारहून महिला कार्यरत आहेत. पोलिस मित्र असोसिएशनच्या महिला राज्याध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत असताना महाराष्ट्रात जवळपास 20हून अधिक जिल्ह्यात महिला नेटवर्क उभारले आहे. पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनेलच्या सह संपादक म्हणून महाराष्ट्र, गुजरात,कर्नाटक व गोवा राज्यात चॅनलचे नेटवर्क वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.संत रोहिदास विकास फाऊंडेशनच्या महिला बचत गट विभागाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून 10 हजारहून अधिक महिलांसाठी पदाच्या माध्यामातून न्याय देण्याचे काम सुरू आहे.डॉ रजनीताईंच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेत जवळपास 50 हून अधिक विविध शासनाचे व नामांकित संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे येवढेच नव्हे तर 5 राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष सुरेश माळी,सेक्रेटरी सुशीला पुजारी,अश्विनीताई पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले होते. यावेळी पोलिस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे,राज्य सल्लागार मुरलीधर शिंदे,रुपाली ठोमके, आशा वाघिरे,संगीता रुग्गे,राजश्री हंकारे,सविता पुजारी,सुनीता पवार,सुप्रिया पाटील,शीतल पाडळकर,शकुंतला पाटील,गुलबशा बागवान,राजश्री बडवे तुळसा काटकर,सुवर्णा लाड, मनीषा आवळे,रेखा मलबादे,हर्षदा आवळे वैशाली गडद व स्वाती केंगार आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
