विद्या मंदिर गर्जन शाळेची गगनभरारी – विद्यार्थ्यांचे प्रज्ञाशोध परीक्षेत उज्ज्वल यश
करवीर – विद्या मंदिर गर्जन शाळेच्या विद्यार्थ्यांनी बॅ. बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा आणि समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा (S.T.S.) 2024-25 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हास्तरीय यश:
इयत्ता सातवी: पूर्वा विशाल कांबळे हिने जिल्ह्यात 22वा क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढवला.
इयत्ता चौथी: विराज राजाराम चव्हाण याने जिल्ह्यात 20वा क्रमांक मिळवत यश संपादन केले.
समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यस्तरीय घवघवीत यश:
शिवम कोपार्डे याने 100 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
भूषण महेंद्र कांबळे याने 98 गुण मिळवत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय यशामागे श्री. अनिल वरुटे सर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मोलाचे ठरले. तसेच, मुख्याध्यापक श्री.रामचंद्र बचाटे श्री. एस. पी. सुतार, श्री. संजय राजाराम रोगे, श्री. ज्ञानेश्वर चंद्रकांत गवळी, श्री. संतोष फड यांचे अनमोल सहकार्य लाभले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचेही सहकार्य लाभले असून, गटशिक्षणाधिकारी श्री. समरजित पाटील, विस्ताराधिकारी श्री. प्रकाश आंग्रे, केंद्रप्रमुख श्री. आर. एस. सुतार आणि मुख्याध्यापक श्री. रामचंद्र बचाटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या यशामुळे विद्या मंदिर गर्जन शाळेचा नावलौकिक उंचावला असून, विद्यार्थ्यांना विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.