राजनंदिनी साळोखे हिचे समृद्धी परीक्षेत घवघवीत यश
गिरगाव : शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता तिसरीच्या समृद्धी परीक्षेत राजनंदिनी संभाजी साळोखे हिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबासह शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने तिचे अभिनंदन केले आहे.राजनंदिनीच्या यशामागे विद्या मंदिर, गिरगाव येथील मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका आणि संपूर्ण शिक्षकवर्गाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे तिने हे यश संपादन केले.तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी अनेक स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.