प्रकाश सुतार यांना पं. मुं डांगरे पुरस्काराने पुणे येथे सन्मानित.
संकल्प माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश सुतार यांना आज महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती ,पुणे यांच्यावतीने हिंदीच्या प्रचार व प्रसार कार्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कुशल संघटक व प्रचारक म्हणून पं. मुं.डांगरे पुरस्काराने पुणे येथे सन्मानित करण्यात आले. राज्यसभेच्या सदस्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. रोख रुपये पाच हजार, प्रमाणपत्र व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती, पुणे चे संचालक जयराम फगरे होते. जून महिन्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील हिंदी प्रचारकांचे संमेलन पुणे येथे घेण्यात येणार आहे. त्यासाठी नेमलेल्या मुख्य समितीमध्ये प्रकाश सुतार यांचा समावेश केला आहे. या नंतर खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात प्रकाश सुतार यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी . हिंदी भाषेतील जेष्ठ साहित्यिक दामोदर खडसे, पुणे आकाशवाणी केंद्राचे माजी निवेदक डॉ. सुनील देवधर ,सोलापूरचे डॉ. बंडोपंत पाटील, रत्नागिरीचे गोविंद राठोड, नाशिकचे आवस्थी उपस्थित होते. या यावेळी राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारी संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये प्रकाश सुतार यांनीही सहभाग घेतला.