सेवंथ-डे एडव्हेंटिस्ट स्कूलचा निकाल ९८%; यशाची परंपरा कायम
कोल्हापूर – सेवेंथ-डे एडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल, शिवाजी पार्क कोल्हापूर या नामांकित शाळेने दहावी (ICSE) बोर्डाच्या मार्च 2025 च्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत एकूण 127 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 125 विद्यार्थ्यांनी यश संपादन करत शाळेचा निकाल ९८% इतका लागला. या यशात महिमा मिलिंद शिर्के (90.66%) हिने प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली, तर आरुषी रावसाहेब चव्हाण (89.50%) हिने दुसरा आणि सार्थक सचिन शिंदे (88.00%) याने तिसरा क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पावती पुन्हा एकदा मिळवून दिली आहे. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी शाळेचे प्राचार्य टी. मोहन राव, मुख्याध्यापक मनोहर कर्नाड, मुख्याध्यापक विनोद आवळे, खजिनदार सुहास विल्सन, पर्यवेक्षक सुनील घाटगे, दिलीप दलपती, जेनिफर लंका, तसेच वर्ग व विषय शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक वृंदाच्या अथक प्रयत्नासोबतच पालक व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे मत प्राचार्य मोहन राव यांनी व्यक्त केले. या गौरवपूर्ण निकालाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.