राज डोअर्स अँड हार्डवेअरला 'महाराष्ट्र उद्योजक सन्मान पुरस्कार 2025'
पुणे : प्राइम टायकून मीडिया आणि टेक एलएलपी यांच्या वतीने दिला जाणारा 'महाराष्ट्र उद्योजक सन्मान पुरस्कार 2025' यंदा मि. विश्वजीत राजकुमार भोसले (मालक, राज डोअर्स अँड हार्डवेअर) यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार 'Best Wooden Door Manufacture' या श्रेणीत त्यांच्या उल्लेखनीय व्यावसायिक कामगिरीसाठी व राष्ट्रनिर्माणात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभ २२ एप्रिल २०२५ रोजी पार पडला. राज डोअर्स अँड हार्डवेअर' हे संस्थान उत्कृष्ट लाकडी दरवाजांच्या उत्पादनासाठी ओळखले जाते. या प्रसंगी आयोजक निलेश साबे (संस्थापक व सीईओ, प्राइम टायकून मीडिया) यांच्या उपस्थितीत गौरव सोहळा पार पडला.