( तालुका - कागल) येथील कन्या, कु.अमृता रामचंद्र शेळके यांची रत्नागिरी पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल त्यांना यशवंत ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. प्रा.संतोष कोळेकर यांनी पुढच्या शिक्षणासाठी यशवंत करिअर अकॅडमीच्या माध्यमातून पुढील शैक्षणिक वाटचालीस सहकार्य करू अशी ग्वाही दिली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष - संतोष कोळेकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पत्रकार अमोल गावडे , धनगर समाज सेवा संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रावसाहेब रानगे, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी राजे रानगे, कागल तालुक्यातील युवा नेते, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप हजारे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोळेकर यांच्यासह पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
