हेर्ले (तालुका - हातकणंगले) येथील ओंकार दादासो
खुरपे
(वय 23 वर्ष)याचा विजेचा धक्का लागून मृत्यु झाला. याबाबतची अधिक माहिती अशी की ओंकार याच्या नविन घराचे काम सुरु आहे.घरासाठी काढलेल्या खड्डयातील साठलेले पाणी काढण्यासाठी ओंकारने विजेची मोटार सुरु केली असता त्या खड्डयातील पाण्यामध्ये वीज उतरल्या मुळे त्याला विजेचा जोरात धक्का बसला.यामुळे तो जागेवर कोसळला.हे घरातील नातेवाईकांच्या निदर्शनास आल्याने त्यानी ओंकारला कोल्हापुर येथील खाजगी व सी.पी.आर. येथे दवाखान्यात दाखल केले.डॉक्टरांनी ओंकारला तपासणी करून मृत घोषित केले.
ओंकार हा गेली दोन वर्षे वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होता.तो कष्टाळू व मनमिळाऊ असल्याने त्याच्या घरातील नातेवाईकांना व मित्रपरिवाराला त्याच्या अकस्मित्त मृत्युमुळे जबर धक्का बसला.
ओंकारच्या पश्चात आई,वडील,बहीन,मामा असा परिवार आहे.
