पेठवडगाव (प्रकाश कांबळे)
येथील लाटवडे रोडवरील विजयसिंह यादव कॉलेजमध्ये 40 मिनिटांपूर्वी बॉम्ब ठेवल्याचा अज्ञाताच्या फोनने आज वडगावात खळबळ उडाली. मात्र, सर्वत्र शोध घेतला असता हा फेक कॉल असल्याचे सिद्ध झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी १० वाजून ३ मिनिटांच्या सुमारास पोलिसांच्या ११२ नंबरला अज्ञाताने कॉल करून लाटवडे रोडवरील विजयसिंह यादव कॉलेजमध्ये चाळीस मिनिटांपूर्वी माझ्या मित्राने बॉम्ब ठेवला आहे, असा कॉल आल्याने यंत्रणेची धावपळ उडाली. पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर आली तातडीने वडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिस्थिती कोल्हापूर मुख्यालयास कळविल्यानंतर कोल्हापूरहून बॉम्ब शोधक व नाशक पथक वडगाव येथे दाखल झाले.कॉलेज समोरील रोड बंद करून नाका बंदी करण्यात आली
प्रथम संपूर्ण कॉलेज रिकामे करण्यात आले. कॉलेजला पोलिसांनी गराडा घालत संपूर्ण कॉलेज पिंजून काढले. परंतु, हाती काहीच लागले नसल्याने अज्ञात व्यक्तीने हा फेक कॉल केल्याचे निष्पन्न झाले. कॉल करणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहे अशी महिती स पो नि भीमगोंडा पाटील यांनी दिली तर कॉलेज चे प्राचार्य प्रा अशोक चव्हाण यांनी सांगितले की आज बॉम्ब ठेवलेली घटना ही अफवा होती आणि उदया पासून कॉलेज सुरळीत चालू राहिल असे सांगितले
