हेर्ले : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २३ ऑगस्ट २०२४ रोजी शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत नव्याने एक शासन आदेश निर्गमित केला आहे. ज्यामध्ये शिक्षकांना अशैक्षणिक कामातून वगळणे बाबत सूचित करण्यात आले आहे.
या अनुषंगाने जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने अप्पर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी जिल्हाधिकारी संजय तेली आणि निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार होळकर मॅडम यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देवुन बी. एल. ओ. च्या कामातून शिक्षकांना मुक्त करणेबाबत निवेदन देण्यात आले.
याबाबत येत्या काही दिवसात वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन निवडणूक अधिकाऱ्यांच्या कडून देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पांढरे, जिल्हा मीडिया प्रमुख मारुती फाळके, जिल्हा प्रवक्ते प्रमोद पाटील, शिरोळ तालुका अध्यक्ष संतोष जुगळे उपस्थित होते.