पट्टणकोडोली श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव यात्राला २१ ऑक्टोबर पासून प्रारंभ
पट्टणकोडोली :-
महाराष्ट्रासह पाच राज्यांत प्रसिद्ध असणारे श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव यात्राला २१ ऑक्टोबर पासून प्रारंभ होणार असल्याचे प्रमुख मानकरी पुरोहित नंदकुमार जोशी यांनी आज ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बैठकीत सांगितले. मंगळवारी रात्री संकेश्वर, बुधनुर रायबाग या भागातून हेगडी व बोते भक्तमंडळी दुधाच्या घागरी घेऊन अनवाणी पायी चलत येऊन देवास दूध अर्पण केले. ही परंपरा या भक्तांच्या कडून अनेक वर्षापासून अखंडित चालू आहे. या दूध अर्पण केल्यानंतर हेगडे बोलते भक्तगणांच्याकडून श्री विठ्ठल बिरदेवाच्या यात्रा ठरविण्याचा कार्यक्रम करण्यात येतो त्यानुसार हा कार्यक्रम बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात झाला, पुरोहित नंदकुमार जोशी यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी हेगडे,बोते भक्त नैवेद्य ,भाकणूक, पहिली पालखी व दुसरी पालखी, मंगळवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी भर यात्रा, सार्वजनिक नैवेद्य,तिसरी व चौथी पालखी, बुधवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी पाचवी पालखी व फुट यात्रा अशा पद्धतीने यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी देवाचे प्रमुख मानकरी प्रकाशकाका पाटील, सिद्राम भाणसे, लक्ष्मण पुजारी बाबासो पुजारी यांनी यात्रा काळामध्ये काय दक्षता घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी देवाचे मानकरी असलेले चौगुले,चव्हाण ,मगदूम,जोशी, कुलकर्णी ,कर्नाटकाहून आलेले बोते, हेगडे, देवस्थान कमिटीचे पंच, सरपंच भाग्यश्री कोळी उपसरपंच अमोल बाणदार, ग्रामविकास अधिकारी तुकाराम हनुमंते, ग्रामपंचायत सदस्य,कोतवाल सात्ताप्पा रामाण्णा, पोलीस पाटील मोहन वर्धन, तसेच समस्त पुजारी धनगर समाज, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.