शिरोली एमआयडीसी येथील महिंद्र कुरियर ऑफीसची घरफोडी उघड. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई.
कोल्हापूर : दि - ३/९/२४. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना घरफोडी रेकॉर्डवरील आरोपी तपासून गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास पथक तयार करून तपास सुरू केलाअसता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार राम कोळी, शुभम संकपाळ, सागर माने, सोमराज पाटील, लखन पाटील, परशुराम गुजरे यांनी केलेल्या तांत्रीक तपासान्वये शिये येथील महिंद्र कुरियर ऑफीसमध्ये केलेली घरफोडी ही तेथील कामगार पंकज यांनीच केली असल्याची खात्री झाली. त्यामुळे तात्काळ पंकज यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव पंकज कुंतीलाल कल्याणकर, वय २३ वर्षे, रा.आर. के. नगर पाचगाव, कोल्हापूर असे सांगीतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याचेकडून रोख रक्कम रूपये ३,०६,०००/- रूपये हस्तगत करण्यात आले आहेत. त्याने आणखीन काही गुन्हे केले आहेत काय याबाबत त्याचेकडे तपास सुरू असून त्यास पुढील कायदेशिर कारवाई करिता शिरोली एम.आय.डी.सी. पोलीस ठाणेस हजर केले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत साो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, राम कोळी, सागर माने, सोमराज पाटील, लखन पाटील, शुभम संकपाळ, परशुराम गुजरे यांनी केली आहे.