तीन वर्ष फरारी आरोपीस अखेर जेरबंद, गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
कोल्हापूर: दि.१५.९.२४
पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी अभिलेखावरील फरारी आरोपींना पकडणेकरीता सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून आरोपींचा शोध घेणेचे काम चालू असताना इस्लामपूर पोलीस ठाणेतील, आरोपी अरुण मारुती घेवदे, मुळ गांव आवंढी, ता. शिराळा, सध्या रा. यशवंत कॉलनी जवळ, गांधी विकासनगर, गल्ली नं.02 कबनूर, ता. हातकणंगले, हा कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याचे समजले. सदर आरोपीस दि. ०२/०६ /२०२१ रोजी प्यारोलवर मुक्त करण्यात आले होते. आरोपी हा रजेवरुन परत कारागृहात हजर होणे बंधनकारक असताना अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा हजर राहिला नाही. म्हणून कारागृह प्रशासनाने आरोपी विरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर आरोपी रजेवर गेले पासून आपण राहत असलेले ठिकाणे वारंवार लपवत असून कोणत्याही प्रकारची माहिती मिळून येत नव्हती. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने विशेष मोहीम राबवली असता. सदर आरोपी हा तांदुळवाडी, ता. वाळवा, येथे असलेची माहिती तपास पथकातील पोलीस अमंलदार महेश पाटील यांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार- महेश पाटील, सागर चौगुले, संजय कुंभार व प्रशांत कांबळे यांनी दि. 14.09.2024 रोजी पहाटे आरोपी अरुण मारुती घेवदे, यास तांदुळवाडी, ता. वाळवा, येथे पकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर केले.
सदरची कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक- रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक - शेष मोरे, पोलीस अमंलदार महेश पाटील, सागर चौगुले, संजय कुंभार व प्रशांत कांबळे यांनी केली आहे.