कोल्हापूर : पोलिस परेड ग्राउंड येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत जिज्ञासा विकास मंदीर (बौद्धिक अक्षम मुलांची शाळा) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ७ सुवर्ण, ४ रौप्य आणि ६ कास्य पदकांची कमाई केली. यासह त्यांनी स्पर्धेची जनरल चॅम्पियनशीप मिळवण्याचा बहुमान पटकावला.स्पर्धेचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाले, तर बक्षीस वितरण जिल्हा परिषद कोल्हापूरचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी संभाजी पोवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी दिव्यांग विभाग प्रमुख सौ. साधना कांबळे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आणि विविध दिव्यांग शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या यशामागे संस्थापिका सौ. स्मिता दिक्षित यांचे मार्गदर्शन तसेच मुख्याध्यापक विशाल दिक्षित, क्रीडा शिक्षक राजू जाधव आणि सौ. वैशाली हणमसागर यांचे विशेष प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले
स्पर्धेतील पदक विजेते विद्यार्थी
▪ सुवर्ण पदक (७)
- उत्कर्ष चव्हाण (५० मीटर पोहणे)
- मंजिरी कुलकर्णी (१०० मीटर धावणे)
- अनुष्का तांबेकर (१०० मीटर धावणे)
- आदिती पिसे (गोळा फेक)
- विनया महिंद्रे (गोळा फेक)
- फिजा (गोळा फेक, १०० मीटर धावणे)
▪ रौप्य पदक (४)
- मंजिरी कुलकर्णी (२०० मीटर धावणे)
- अनुष्का तांबेकर (लांब उडी)
- मंथन कणसे (लांब उडी)
- आदित्य कुलकर्णी (५० मीटर पोहणे)
▪ कास्य पदक (६)
- सृजन धारवाडकर (२०० मीटर धावणे)
- आदिती पिसे (१०० मीटर धावणे)
- साई मिसाळ (१०० मीटर धावणे)
- अपूर्वा पोवार (गोळा फेक)
- शिल्पा डोंगरकर (गोळा फेक)
- अर्थव होडगे (लांब उडी)
या कामगिरीमुळे जिज्ञासा शाळेचे नाव जिल्ह्यात गाजले असून, विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.