गर्जन (ता. करवीर) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू
गर्जन, ता. करवीर - येथील अखंड हरिनाम सप्ताहाला यंदा ३० वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा *दि. १९ मार्च ते २७ मार्च २०२५* या कालावधीत संपन्न होणार आहे. सप्ताहाच्या प्रारंभी हरिभक्त परायण माऊली महाराज चांदेकर यांच्या हस्ते वीणापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या सोहळ्यात काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण, संध्याकाळी प्रवचन व रात्री हरिकिर्तन यांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने गावातून भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महिलांसह गावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
गर्जन गावातील युवा किर्तनकार संभाजी चव्हाण महाराज, चंद्रकांत चव्हाण, रामचंद्र नाईक, सागर गुरव,विनोद चव्हाण आणि राधेय चव्हाण व ग्रामस्थ या दिंडी सोहळ्यात सहभागी होते..तसेच या सप्ताहात नामदेव पाटील महाराज, मारुती भोसले महाराज, संभाजी दुर्गुळे महाराज, सुभाष शिंगे महाराज, संभाजी चव्हाण महाराज, विठ्ठल गावडे महाराज, राजू सुतार महाराज, सुभाष पाटील महाराज (विसापूरकर) यांचे प्रवचन आणि किर्तन होणार आहे.
या भक्तिमय सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.