कोल्हापूर युवतीसेनेच्या वतीने महिला दिनानिमित्त "शिवकन्या" सन्मान सोहळा
कोल्हापूर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर युवतीसेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने CPR - छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना आणि नर्सेस भगिनींना "शिवकन्या" सन्मान देऊन गौरविण्यात आले.
रुग्णालयातील स्वच्छता राखण्यासाठी आणि रुग्णसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या भगिनींना हा सन्मान देऊन त्यांच्या कष्टांची दखल घेण्यात आली. या उपक्रमाद्वारे युवतीसेनेने आपल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली.
कार्यक्रमात CPR प्रशासनाचे डॉ. गिरीश कांबळे यांनी युवतीसेनेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आणि महिलांच्या कार्याची प्रशंसा केली.
यावेळी युवासेना जिल्हा युवाअधिकारी मंजित माने, युवतीसेना उपजिल्हा युवतीअधिकारी श्वेता सुतार, सानिका दामूगडे, माधुरी जाधव, प्रिया माने, प्रज्ञा लोणारे, समृद्धी गुरव, अस्मिता पाटील आणि CPR प्रशासनातील महिला भगिनी उपस्थित होत्या.