शिर्डी (प्रतिनिधी) – अभिनय, लेखन व दिग्दर्शन क्षेत्रात आपल्या बहुआयामी कार्याने नावारूपास आलेले मुरलीधर शामरावजी बारापात्रे यांना राष्ट्रीय पातळीवरील साई कलारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा सन्मान ओम साई विकास प्रतिष्ठाण व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने देण्यात येणार आहे.सदर पुरस्कार सोहळा ३ मे २०२५ रोजी (शनिवारी), सकाळी १०:०० वाजता, शिर्डी येथील हॉटेल शांतीकमल येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बारापात्रे स्वतः एक सहकाऱ्यासह उपस्थित राहणार आहेत.पुरस्कार समितीचे अध्यक्ष सुदाम कचरु संसारे (प्रोप्रा. ओम साई विकास प्रतिष्ठाण, कानडगाव, राहुरी, अहमदनगर) यांनी पुरस्काराची घोषणा करताना सांगितले की, “मुरलीधर बारापात्रे यांचे अभिनय क्षेत्रातील योगदान हे प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याला सन्मानित करण्याचा हा प्रयत्न आहे.”या निवडीमुळे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रात कार्यरत कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.