राष्ट्रपती यांच्या दौऱ्यामुळे भाविकांना सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ ही वेळ वगळून श्रीअंबाबाईच्या दर्शनाची व्यवस्था
कोल्हापूर, दि. 31 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवार दि.२ सप्टेंबर २०२४ रोजी करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव दर्शनाची गैरसोय होवू नये, यासाठी २ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंतचा कालावधी वगळून भाविकांनी इतर वेळी देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती मार्फत करण्यात आले आहे.