हेरले येथील जनकल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पत- संस्थेकडून वर्धापन दिनानिमीत्त रक्तदान शिबीर संपन्न : चेअरमन निलोफर खतीब..
हेरले (तालुका हातकणंगले): येथील जनकल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित हेरलेच्या दुसच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करणेत आले.त्यामध्ये ४० रक्त दात्यानी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले .
प्रारंभी दिप प्रज्वलन संस्थेच्या चेअरमन निलोफर खतीब यांनी केले व फोटो पुजन व्हाईस चेअरमन विजय भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख उपस्थितीत संस्थापक - अस्लम खतीब होते.
यावेळी संस्थेचे संचालक संजय पाटील, जाफर बियकते,संजय खाबडे, नितीन परमाज, रमजान देसाई, राजकुमार चौगुले, प्रशांत माळी, अर्चना कोळेकर हबीब मिर्झाई समीर नायकवडी, उपस्थित होते.
महालक्ष्मी ब्लड बँकेचे डॉक्टर कुलकर्णी तसेच त्यांचा सर्व स्टाफ याचे मौलीक सहकार्य लाभले. यामध्ये ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. संस्थेचे मॅनेजर अमोल ढवळे, विनायक उबारे,अमन खतीब, व अनंत कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.त्याचप्रमाणे संस्थेचे सभासद, ठेवीदार हितचिंतक याचे देखील सहकार्य लाभले. सर्वांनी संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.