कोल्हापूर,दि. ३० (प्रतिनिधी चंद्रकांत दिंडे ) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर अधीक्षक श्रीमती स्नेहलता श्रीकर - नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांचे मार्गदर्शनानुसार राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज विभागाने आजरा-आंबोली रोडवर गवसे गावच्या हद्दीत पुलाजवळ सापळा रचून गोवा बनावटीची दारु वाहतूक करणारी मारुती सुझुकी अल्टो क्रं. एम. एच. -०६- बी. इ.- ०४३५ पकडण्यात आली. कारमधील गोवा बनावटी दारुच्या विविध ब्रॅडचे ४१ बॉक्स मिळून आले. ५५,५३६०/ किंमतीचा वाहनासह एकूण मुद्देमाल जप्त करुन पुढील चौकशीसाठी चालकास ताब्यात घेण्यात आले. आरोपी रविराज आंबानी सावंत याचेवर बेकायदेशीररीत्या गोवा बनावटी दारुची वाहतूक केलेबाबत महाराष्ट्र दारुबंदी कायदयाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज निरीक्षक पी. आर. खरात, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एन.एस. केरकर, जवान संदीप जानकर, बी.ए. सावंत, एस. बी. चौगुले यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास गडहिंग्लज एक्साईज चे दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे करत आहेत.