जाहीर निषेध जाहीर निषेध
शिवसैनिकांनी केला शिंदे सरकारचा निषेध
महाराष्ट्रात देशभरात होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ वाठार तर्फ वडगांव परिसरातील शिवसैनिकांनी वाठार तर्फ वडगांव ब्रिज चौकात जोरदार निदर्शने करून घटनेचा व अशा घटना रोखण्यात अपयशी ठरलेल्या शिंदे सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता वाठार तर्फ वडगाव येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते संदीप दबडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर उतरले व वाठार एसटी स्टँड परिसरात हातात काळे झेंडे व निषेधाचा फलक घेऊन गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे शिंदे सरकारचा जाहीर निषेध असो गृहमंत्री राजीनामा द्या गृहमंत्र्यांचा धिक्कार असो.. अशा घोषणा दिल्या जात होत्या व शिंदे सरकारचा निषेध नोंदवला
यावेळी उदय शिंदे सागर चोपडे सचिन घाडगे संतोष भोसले नंदू क्षिरसागर सर्जेराव गायकवाड संभाजी वाक्से चंद्रकांत खडतरे शशिकांत भोसले योगेश दबडे मोहसीन पोवाडे शंकर गायकवाड लालासो माने भानुदास पाटील जालिंदर जाधव राजू पठाण निलेश चव्हाण रवी कांबळे शिवाजी बल्लाळ जीएम सनदे कपिल कांबळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
