यशवंत ब्रिगेड च्या वतीने कॅबिनेट मंत्री, हसनसो मुश्रीफ यांना निवेदन
यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने
अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेतील जाचक अटी रद्द करण्याबाबतचे निवेदन हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. सदर निवेदनामध्ये
अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेद्वारे महिलांना २५ लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळणार आहे. त्याबद्दल सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन.. परंतु त्यामध्ये काही जाचक अटी आहेत. स्टार्टअप मध्ये महिलांचा ५१ टक्के वाटा असणे गरजेचे आहे. महिलांची स्टार्टअप ची नोंद एक वर्षापूर्वीची असावी . स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल हे १० लाख ते १ कोटीपर्यंत असावी. असा जाचक अटी आहेत.
यशवंत ब्रिगेडची मागणी आहे की स्टार्ट अप मध्ये महिलांचा वाटा २०% करण्यात यावा व सरकारने 80 वाटा उचलावा.ग्रामीण भागातील बहुतांश महिला भगिनी या अशिक्षित असल्याने स्टार्टअप ची व उद्योग नोंदणीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसल्यामुळे आपण दिलेली उद्योग नोंदणीची १ वर्षांची अट त्या पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे तात्काळ नोंदणी केल्यानंतरही या योजनेचा लाभ त्यांना मिळावा, तसेच वार्षिक उलाढाल ची मर्यादा ही कमी करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा. संतोष कोळेकर, अमोल गावडे, संदीप हजारे, रावसो रानगे, शिवाजी रानगे, बाळासाहेब कोळेकर, महादेव पुजारी, प्रकाश गोरड,सीमा झोरे, योगिता घुले इ. यशवंत ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.
