तपासात कुचराई झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर ) तीव्र आंदोलन करणार
कोल्हापूर दि. 23 ऑगस्ट/
दि. 22 ऑगस्ट रोजी शिये, ता. करवीर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला कठोरात कठोर शासन होणेकरिता सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी या मागणी करिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आंबेडकर) तर्फे पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.
यावेळी ... कामासाठी मजूर पाहिजेत म्हणून, त्यांना मिळणारे जे संरक्षण आहे त्यातूनच हि गुन्हेगारी निपजत असल्याचे सांगून परप्रांतीयांच्या वास्तव्यावर पोलीस प्रशासनाने निर्बंध घालावेत अशीही मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. शीये येथे घडलेली घटना
माणुसकीला काळिमा फासणारी असल्याची अधोरेखित करून
आरोपीला फाशीची शिक्षा होण्याकरिता पोलीस प्रशासनाने, तपास यंत्रणेने प्रयत्न करावेत अशी मागणी करत या प्रकरणी हयगय केल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाप्रशासनास देण्यात आला.
यावेळी रूपाताई वायदंडे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्राचे नेते मारुती गायकवाड, शहराध्यक्ष प्रताप बाबर, शहर संघटक अमर तांदळे, शेरू हळदीकर, महिला आघाडीच्या वंदना वायदंडे, सरपंच विश्वजीत कांबळे, शामराव मोरे, कृष्णात तिटवेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
