सार्वजनिक गणेश मंडळांचा संभ्रम दूर परंपरेनुसार गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
कोल्हापूर - श्री. गणेशोत्सव सोहळयास दि. ०७ सप्टेंबर २०२४ रोजी पासून सुरवात होत असून श्री. गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना दि. ०७ सप्टेंबर रोजीच करावी अन्यथा सदर मंडळावर प्रशासनाचे वतीने कारवाई करण्यात यईल अशाप्रकारचा संभ्रम अथवा गैरसमज निर्माण झाला होता. याबाबत अनेक मंडळांनी प्रशासनाकडे प्रत्यक्ष भेटून तसेच निवेदनाद्वारे विचारणा केली होती.
कोल्हापूर जिल्हयातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी त्यांच्या दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे श्री. गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करावी. सदर प्रतिष्ठापनापुर्वी मिरवणूक काढत असल्यास त्याची प्रशासनाकडून परवानगी घेण्यात यावी. जेणेकरुन सार्वजनिक मंडळांना तसेच प्रशासनास वाहतूक व बंदोबस्ताचे नियोजन करणे सुलभ होईल. असे जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर. यांनी कळविले आहे
