शिरोली :- कन्या विद्यामंदिर शिरोली नं 1 शाळेत
शाम टाईल्स यांचेकडून शाळेला संगणक , विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे , सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ देण्यात आला.
शाळेची माजी विद्यार्थिनी राधा खरसकर ही एस. एस .सी बोर्ड परीक्षेत शिरोली केंद्रात प्रथम आल्याबद्दल मान्यवरांच्या कडून तिचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे , उपसरपंच बाजीराव पाटील , माजी उपसरपंच कृष्णात करपे ग्रामपंचायत सदस्य सुजाता पाटील , महादेव सुतार , विजय जाधव , आरिफ सर्जेखान , बाळासाहेब पाटील , मोहिद्दीन देसाई, पंचगंगा पाणीपुरवठा व विकास सेवा सोसायटीचे संचालक संजय पाटील , विरपत्नी श्रीम.बेबीताई पोर्लेकर,शाम टाईल्सचे मालक राजेश शिकची, गीता शिकची ,सुरभी शिकची , जयकीसन शिकची, सर्व कर्मचारी वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रणजित मोहिते, सदस्य राजाराम करपे , समिना फकीर , सुजाता चव्हाण , प्रकाश पाटील , सागर मोरे , निशीकांत पाटील , मुख्याध्यापिका अंजना संकपाळ , आनंदा पाटील, बयाजी माने,प्रमिला पाटील ,सुनीता माने , पूर्वा दळवी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले.
