05 मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड व दोन चोरट्यासह 1,30,000/- रूपये किंमतीच्या 06 मोटर सायकल जप्त !!
स्थानिक गुन्हे अन्वेषण ची कारवाईकोल्हापूर : दिनांक ५ /९/२४
पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे व इतर पोलीस अंमलदार यांचे करवी तपास सुरू केला असता सदर दोन इसम दिंडनेर्ली फाटा, ता. करवीर, येथे दि. 04/09/2024 रोजी येणार असलेच्या माहिती आधारे सापळा लावून आरोपी 1) ऋषिकेश उर्फ गणेश उमेश पाटील व.व. 25, रा. राधानगरी, ता. राधानगरी 2) अक्षय चंद्रकांत पाटील व.व. 29, रा. शिरगांव, ता. राधानगरी, यांना विना नंबर प्लेट मोटर सायकलसह ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याचे ताब्यातील असलेली स्प्लेंडर मोटर सायकल ही चोरीची असून सदरचा गुन्हा त्यांनी व त्यांचा साथीदार सुहास नामदेव चव्हाण रा. राधानगरी, यांनी मिळुन केले बाबत गोकुळ शिरगांव पोलीस ठाणेत गुन्हा दाखल असलेची माहिती मिळाली. सदर आरोपी कडे अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यासह एकूण 05 मोटर सायकल चोरीचे गुन्हे केलेची माहिती सांगितली. सदर आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यासह वापरत असलेली मोटरसायकल अशा एकूण 1,30,000/- रुपये किंमतीच्या 06 मोटर सायकली हस्तगत केल्या असून
गोकुळ शिरगाव,इस्पुर्ली,शाहुवाडी
पंढरपूर शहर, पोलीस ठाणेत गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक,- महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक- रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक- चेतन मसुटगे, तसेच पोलीस अंमलदार बालाजी पाटील, सतिश जंगम, वसंत पिंगळे, अमित मर्दाने, कृष्णात पिंगळे, संजय हुंबे यांनी केली आहे.