साथीदार चहा सेंटर उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
चोकाक : हातकणंगले तालुक्यात माले फाटा येथे नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या साथीदार चहा सेंटर चा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ अविनाश बनगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. व चोकाक गावातील उपस्थित मान्यवर तसेच गावचे सरपंच सुनिल चोकाककर उप सरपंच सौ शितल ननवरे यांच्यासह चेअरमन मनोहर पाटील, राजाराम साखर कारखाना संचालक नंदकुमार भोपळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात केली प्रथमेश ननवरे यांच्या नवीन व्यवसायास बळ देण्या करिता व प्रो्साहन देण्या करिता उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद भोपळे, हर्षदकुमार कांबळे, व्हणाळे, पी के पाटील, जयसिंग ढेरे, तानाजी ननवरे, महादेव माळी, नितीश कदम,अखिल चव्हाण, सुभाष चोकाककर, यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.