जयसिंगपुरात गांजा विक्री करणाऱ्यास पकडले ८८,४२०/ रु . किमतीचा गांजा जप्त, गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई,
कोल्हापूर:- दि. १२/०९/२०२४पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने अवैध धंदे, अंमली पदार्थ साठा असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांना दिले होते. या कामी पोलीस पथके तयार करून माहिती घेत असताना पोलीस अंमलदार शुभम संकपाळ यांना जयसिंगपूर ते सांगलीकडे जाणारे बायपास रोडवर हॉटेल आदित्य गार्डनजवळ एक इसम गांजा विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाली होती.
सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक- रविंद्र कळमकर यांनी गुन्हे अन्वेषन शाखेकडील पोसई शेष मोरे व त्यांचे सहकारी यांनी खात्री करून दि. ११/०९/२०२४ रोजी सायंकाळी छापा टाकला असता एक इसम गांजासह मिळून आला, त्याने त्याचे नांव नवाज अब्दुलगणी मुल्ला (वय २४) रा. ढोरगल्ली, दर्गाजवळ, मिरज, असे सांगितले. त्याच्याकडे एकूण किमंत रुपये ८८.४२०/- किमतीचा ४ किलो २० ग्रॅम वजनाचा गांजा व एक मोबाईल हॅन्डसेट असा मुददेमाल मिळून आला. त्याला मुद्देमाला सह ताब्यात घेऊन जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.