कळंबा येथील डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील चोरी उघड १५ तोळे ८ ग्रॅम वजनाचे ८,४५,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत.
गुन्हे अन्वेषण शाखेची कामगीरी.कोल्हापूर:- दि- ११/९/२४डॉ.सौ. दिपाली सुभाष ताईगंडे, रा. आदिनाथ नगर, कळंबा रोड, कोल्हापूर यांचे राहते घरातून माहे फेब्रुवारी २०२४ ते दिनांक ०४/०४/२०२४ रोजी दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने १५ तोळे ८ ग्रॅम वजनाचे ८,४५,०००/-रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेलेने करवीर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला.
सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेचे दृष्टीने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना वरिष्ठांनी सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने
रविंद्र कळमकर यांनी शाखे कडील सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे तसेच पोलीस अमंलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रविण पाटील, संतोष बरगे, प्रदिप पाटील, विशाल खराडे व महेंद्र कोरवी, यांचे पथक तयार करुन गुन्हा घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली असता तपास पथकातील पोलीस अंमलदार गजानन गुरव यांना माहिती मिळाली की, सदरची चोरी, घरामध्ये कामास येणारा प्रसाद माने याने केली असून तो आज रोजी गुजरी कोल्हापूर येथे चोरीचे दागीने विक्री करिता घेऊन येणार आहे. सहा. पोलीस निरीक्षक मसुटगे व पोलीस पथक यांनी गुजरी येथे सापळा लावून प्रसाद रघुनाथ माने, वय २० वर्षे, रा. सुर्वे नगर, कळंबा, यास ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने डॉ. दिपाली ताईगडे यांचे घरी चोरी केली असल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातील चोरीचे १५ तोळे ०८ ग्रॅम वजनाचे ८,४५,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने जप्त केले. व मुद्देमालासह आरोपीस पुढील कारवाई साठी करवीर पोलीस ठाणे येथे हजर केले असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे तसेच पोलीस अमंलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रविण पाटील, संतोष बरगे, प्रदिप पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे व नामदेव यादव यांनी केली आहे.