उचगाव येथील इसमाकडून 01 पिस्टल, 01 रिव्हॉल्वर व 02 जिवंत राऊंड हस्तगत.
गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई
कोल्हापूर:- दि- ११ पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गणेशोत्सव शांततेच्या वातावरणात पार पाडावा यासाठी हत्यारे, शस्त्रे बाळगणारे लोकांची गोपनीय माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेबाबत पुन्हा अन्वेषणला सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने
पोलीस निरीक्षक,रविंद्र कळमकर यांनी शाखेकडील पथक तयार करून त्यांना तपासाबाबत योग्य त्या सुचना दिल्या. सदर पथकातील वैभव पाटील यांना उचगाव येथे राहणारा रोहन पाटील याचेकडे 01 पिस्टल व 01 रिव्हॉल्वर असून तो आज रोजी माळीवाडा, उचगाव येथे विक्री करणेसाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता सदर पथकाने माळीवाडा, उचगाव येथे सापळा लावला असता रोहन रुपेश पाटील, वय 20 वर्षे, रा. विठलाई कॉलनी, मणेरमळा, उचगाव, ता. करवीर हा मिळून आला. त्याच्या ताब्यातील 01 पिस्टल, 01 रिवॉल्वर व 02 जिवंत राऊंड असा एकूण 1,01,000/- रूपये किंमतीच्या वस्तु मिळून आल्या असून त्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर इसमाविरुध्द गांधीनगर पोलीस ठाणेस आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदरच्या वस्तु कोणाकडून व कोणत्या उद्देशासाठी आणल्या आहेत याबाबतचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बरगे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, प्रविण पाटील, प्रदिप पाटील, विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांनी केली आहे.