कोल्हापूर :- शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी, सायं. 6.00 वाजता राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर येथे श्री. मिलिंद डिगे यांच्या 'म्युझिक लव्हर्स ' या कराओके स्टुडिओचा Live Consert हा हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करणेत येणार आहे.
सदर कार्यक्रमामध्ये जेष्ठ संगीतकार जीवन आनंद यांचा सहभाग लाभलेल्या कलाकारांचा समावेश असून सदरचा कार्यक्रम पूर्णपणे मोफत आयोजित करणेत आलेला आहे. तरी, त्याचा सर्वानी लाभ घ्यावा असे म्युझिक लव्हर्स या कराओके स्टुडिओ, कोल्हापूर, चे श्री. मिलिंद डिगे यांनी सांगीतले. सदर मॅफीलीत स्वरसाज भिकू कांबळे, राकेश कोले, संजय चौगुले, रहिम खान, जानवी म्हाकवे, सुजाता मिसाळ, श्रृती जोशी, सरीता सुतार, सागर सुतार, गुरुप्रसाद सुतार, विनोद कामते, संजय मेटील, यांचा आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख निमंत्रिक पाहुणे कलाकार मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकरसो, नितीन सोनटक्के आणि सुरज नाईक हे आहेत.
संगीतसाथ सिंथेसायझर आकाश साळोखे, अॅक्टोपॅड- सचिन जाधव, तबला/ढोलक - हणमंत चौगुले, तुंबा /कोंगो - नितीन पालकर (मुंबई), बेस गिटार मिलिंद बनसोडे, लिड गिटार- हृतिक साटम आहेत त्याच बरोबर लाईट । साऊंड- रमेश सुतार व निवेदक-
हेमंत जोशी आहेत.
या कार्यक्रमाची निर्मिती मिलिंद डिगे व संकल्पना भिकू कांबळे
यांची आहे .तरी रसिक प्रेक्षकांनी सदर कार्यक्रमाचा आनंद लुटून लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात आले आहे.