बच्चे सावर्डे गावात मांगले रोड लोकवस्ती जवळ मगरीचे पिल्लू सापडले.
बच्चे सावर्डे ;- दि -
बच्चे सावर्डे गावात मांगले रोड लोकवस्ती जवळ मगरीचे पिल्लू निर्भय बच्चे यांना सापडले होते.
वारणा नदी पासुन एक किलोमीटर अंतरावर लोकवस्ती मध्ये मगरीचे पिल्लू सापडल्या मुळे बच्चे सावर्डे गावांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदरची माहिती वन विभाग पन्हाळा यांना कळवल्यानंतर वन्यजीव बचाव पथकासह टीम दाखल झाली.त्यांनी सदर पिल्लास सुखरूपपणे नदीपात्रात सोडून दिले.यावेळी वनरक्षक संदीप पाटील बाजीराव देसाई वनपाल सागर पटकारे तसेच वन्यजीव बचाव पदकाचे सदस्य अभिजीत पाटील अजिंक्य बच्चे सचिन जाधव या वनविभाग पन्हाळा टीमने दाखवलेल्या तत्परतेबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी पोलीस पाटील सागर यादव, निर्भय बच्चे, मानसिंग यादव, रणवीर बच्चे. आदर्श संकपाळ उपस्थित होते.