कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम
कोल्हापूर :- दि.14/09/2024.
अनंत चतुर्दशी दिवशी सर्व मार्गावरील के.एम.टी. बससेवा बंद
मंगळवार दि.17/09/2024 रोजी "अनंत चतुर्दशी" या दिवशी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते व बसमार्ग वाहतूकीसाठी बंद असतात. त्यामुळे दि.17/09/2024 रोजी सर्व मार्गांवरील के.एम.टी बससेवा तसेच सवलत पास वितरण केंद्र बंद रहाणार आहेत.
तसेच, बुधवार दि.18/09/2024 रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणूक मुख्य मार्ग खुले होतील त्यानुसार के.एम.टी. बस सेवा सुरु करणेत येईल, याची सर्व प्रवासी नागरिकांनी नोंद घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन करणेत येत आहे.