ड्रग्जसह युवक ताब्यात ,१५,५१०००/रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने अवैध धंदे, अंमली पदार्थ साठा करीत असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते.
त्या अनुषंगाने गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांना दि- १३/०९/२०२४ रोजी करवीर पोलीस ठाणे च्या हद्दीत संकल्पसिध्दी हॉलच्या समोर मोकळया मैदानात एक व्यक्ती एम.जी. हेक्टर वाहनातून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने
रविंद्र कळमकर यांनी शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उप निरीक्षक जालींदर जाधव, व इतर स्टाफ यांनी एम.जी. हेक्टर वाहनासह एका इसमास सापळा लावुन ताब्यात घेतले व चालकास त्याचे नांव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव समीर उर्फ साजन उर्फ पाबलो गुलाब शेख (वय वर्षे ३१) रा. नाना पाटीलनगर, कोल्हापूर. मुळ रा. बारामती, पुणे असे सांगितले. त्याचेकडे १२ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज मिळून आले. कारवाई दरम्यान त्याच्या ताब्यातुन वापरलेले वाहन, मोबाईल व एम.डी ड्रग्जसह एकुण - १५,५१,०००/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर इसमाचे ताब्यात मिळुन आलेला ड्रग्ज हा त्याने मनीष रामविलास नागौरी रा. सांगली नाका, इचलकरंजी, याचेकडून घेतला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ मनीष रामविलास नागौरी यास ताब्यात घेऊन
सदर आरोपी विरूध्द करवीर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हयाचा अधिक तपास गुन्हे अन्वेषन व सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे हे करीत आहेत.
सदर आरोपी यांची कसून चौकशी चालू असून गुन्हे अन्वेषन शाखा, कोल्हापूर यांचे तर्फे शोध सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रंविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उप निरीक्षक -जालींदर जाधव, महेश गवळी, अशोक पवार, अमित सर्जे, संतोष बर्गे, वैभव पाटील, विजय इंगळे, विनोद कांबळे, महेंद्र कोरवी, रोहीत मर्दाने, शुभम संकपाळ, महादेव कुराडे, नामदेव यादव, राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे.