डॉल्बीला फाटा देत, टाळ मृदंगाच्या गजरात व विठू रयाच्या गजरात दुर्गेवाडीत गणेश विसर्जन
सप्टेंबर १४, २०२४
दुर्गेवाडी :-दुर्गेवाडी (ता-हातकणंगले) येथे "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" आशा अखंड गजरात भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात घरगुती गौरी गणपतीचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. गेली पाच दिवस अमाप उत्साहात गणेश उत्सव सोहळा गणेश भक्तांनी मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला. यावेळी विधीवत पूजा व आरती करून घरगुती गणपती बाप्पा बरोबरच गौरीचे विसर्जन करण्यात आले. परिसरातील गणेश भक्तांनी विहीर, तलाव, नदी, या ठिकाणी घरगुती गणपतीचे व गौरीचे विसर्जन केले. त्याचबरोबर विहीर, नदी, तलाव, प्रदूषण होऊ नये या याकरिता निर्मल्य दान करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली ठेवण्यात आली होती. कुंभोज ग्रामपंचायतच्या वतीने निर्मल्य दान करण्याचे आवाहन केले होते. त्या आव्हानास गणेश भक्तांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. गणेश भक्ताकडून निर्मल्य दान करून नदी, तलाव, विहीर, प्रदूषण मुक्त होण्यास प्रतिसाद मिळाला. तसेच "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" च्या अखंड गजरात भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात घरगुती गौरी गणपतीचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले गेली पाच दिवस अमाप उत्साहात गणेश उत्सव सोहळा गणेश भक्तांनी साजरा केला विधीवत पूजा व आरती करून घरगुती गणपती बाप्पा बरोबरच गौरीचे विसर्जन करण्यात आले परिसरातील गणेश भक्तांनी विहीर तलाव नदी ठिकाणी घरगुती गणपतीचे व गौरीचे विसर्जन केले तसेच विहीर नदी तलाव प्रदूषण होऊ नये या करता निर्मल्य दान करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली ठेवण्यात आली होती.व निर्मल्य दान करण्याचे आवाहन ग्रामपंचायत कुंभोज यांनी केले होते. या निर्माल्य दान उपक्रमास गणेश भक्तांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. दुर्गेवाडी येथील गोल्डन गणेश कला व सांस्कृतिक मंडळ, दुर्गेवाडी वसाहत नंबर दोन यांच्यावतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील गणेश मूर्ती व गौराई प्रतिष्ठापना केलेल्या सर्वच कुटुंबातील पुरुष व महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करुन डॉल्बीला फाटा देत, टाळ मृदंगाच्या गजरात व विठू रयाच्या गजरात "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषात मिरवणुकीने कुंभोज येथील गाव तलाव येथे प्रस्थान केले. येथील गोल्डन गणेश कला व सांस्कृतिक मंडळ दुर्गेवाडी वसाहत नंबर दोन यांच्यावतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कुंभोज चे बीटअंमलदार शिंदे यांनी दिंडीस भेट दिली यावेळी गावातील गणेश भक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.