*महिला लोकशाही दिनाचे मंगळवारी आयोजन*
कोल्हापूर, दि. 13 : माहे सप्टेंबरचा महिला लोकशाही दिन मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस.वाईंगडे यांनी दिली आली आहे.
महिला लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक तक्रारींचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.