पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित यांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गाची केली पाहणी
सप्टेंबर १०, २०२४
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित यांनी गणेश उत्सव विसर्जन योग्यरित्या पार पाडण्यासाठी राजवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा तलाव येथील इराणी खन या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गाची पायी पाहणी केली.