जात धर्म पंथ आणि
देश या बाहेर स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे अण्णाभाऊ साठे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे महान मानवतावादी लेखक होते असे प्रतिपादन प्रा.डॉ.शरद गायकवाड यांनी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.ते कोल्हापूर जिल्हा सकल मातंग समाज व मातंग विकास महासंघ प्रबोधनी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा चे आयोजन शाहू स्मारक भवन कोल्हापूर मध्ये केले होते.या सोहळ्यासाठी आमदार राजू बाबा आवळे व माजी आमदार राजीव आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेले होते.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. गायकवाड म्हणाले शेतकरी कामगार शेतमजूर अशा कष्टकरी श्रमिकांचे दुःख त्यांच्या व्यथा वेदना अण्णाभाऊ साठे यांनी जगाच्या वेशीवर मोठ्या जोरकसपणे मांडल्या तसेच या कष्टकऱ्यांच्या रक्त अश्रू आणि घाम यांची महती अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या वाणी लेखणी द्वारे अजरामर केली. माणूस माणुसकी आणि मानवतावाद ही अण्णाभाऊंच्या जीवन तत्वज्ञानाची त्रिसूत्री होती. 1961 मध्ये अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य पराक्रम रशिया देशाला सांगितला म्हणून अण्णाभाऊ साठे खरे शिवशाहीर होते. असेही डॉ.गायकवाड म्हणाले यावेळी या सन्मान सोहळ्यात मार्गदर्शन करताना माजी आमदार राजीव आवळे यांनी मातंग समाजाने आयोजित केलेल्या अशा उपक्रमांना व चालवलेल्या चळवळींना समाजाने संघटित राहून पाठबळ दिले पाहिजे व एकसंघ राहिले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी आमदार राजू बाबा आवळे यांनी समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी व मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आवाहन केले. यावेळी या सन्मान सोहळ्यामध्ये समाजातील महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त समाजसेवक, डॉक्टर,वकील, पत्रकार,लोकनियुक्त सरपंच, डेप्युटी सरपंच व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वागत आणि प्रास्ताविक प्रा.अशोक आळतेकर यांनी केले यावेळी डॉ. प्रा. मोहन लोंढे सर, डॉ.प्रा.अमोल महापुरे सर व डॉ.प्रा.सुकुमार आवळे सर यांनीही अण्णा भाऊंच्या साहित्य व विचार यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास इचलकरंजीचे नगरसेवक शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन अब्राहम आवळे अड.दत्तात्रय कवाळे एड. रणजीत कवाळे रूपाताई वायदंडे,गोपाळ साठे, बाबासाहेब दबडे, महावीर सर्वगोडे,लालासाहेब नाईक, मारुती गायकवाड, प्रवीण भोरे, रमेश पाटोळे, सचिन घाडगे, उदय मिसाळ सुरेश दबडे याबरोबर समाजातील अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते आभार प्रदर्शन बाबासाहेब यशवंत यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. श्रीकांत पाटोळे सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महासंघाचे सुनील समुद्रे, बालाजी रोडगे,रूबेन लोखंडे,मोजेस घाटगे, विजय कांबळे, राजेश पाटोळे,संपत कांबळे,जितेंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, अरुण घाटगे, राजेश घाटगे,जीवन यशवंत, सुखदेव यशवंत, अनिलअवघडे, राजू अवघडे, महावीर सर्वगोडे, विजय शिंदे, अनिल सकटे, योहान आवळे, एड. अंकुश सर्वगोडे,अनिल बिरांजे, गणेश कुरणे यांनी मोलाचे सहकार्य केले.