बोरगांव/ प्रतिनिधी - अशोक दुर्गमर्गे
बोरगाव : (ता-निपाणी ) येथील आर के नगर येथे आमदार शशिकला जोल्ले यांच्या विषेश प्रयत्नाने स्केयर सिटी योजनेतून मंजुर झालेल्या बोअरवेल खुदाईचा शुभारंभ आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
भाजप नेते सुनील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बोअरवेल खुदाई कामाचा शुभारंभ करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक शिवाजी भोरे यांनी करून ,गेल्या अनेक वर्षापासून आर के नगर या ठिकाणी पाण्याची समस्या होती.ही समस्या भागाच्या लोक प्रिय आमदार शशिकला जोल्ले यांच्या समोर मांडली असता त्यांनी तत्काळ निर्णय घेऊन या ठिकाणी बोअरवेल ला मंजुरी दिली.आहे.या बोअरवेल मुळे येथील पाण्याची समस्या कायम स्वरुपी मिटणार आहे.या कामामुळे ग्रामस्थांतून आमदार शशिकला जोल्ले यांचे सर्वत्र कौतुक व समाधान व्यक्त केले जात असल्याचे श्री भोरे यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजप नेते सुनील.पाटील,रमेश मालगावे,शिवाजी भोरे,बाबसाहेब चौगुले,अजित कांबळे,फिरोज अफराज,महिपती खोत,देव माळी,अभिषेक फिरगणंवर, शिशिर सातपुते,नारायण आडेकर, काकसाहेब वाघमोडे,विनोद भैरे,उदय पवार,वसंत खोत,शिवाजी नरुटे, रामचंद्र पवार,संतोष पूजारी,बाबू पाटिल,निखिल चिपरे, यांच्यासह अन्य उपस्थित होते.