दोन परप्रांतीय इसमांसह, १४ किलो गांजा जप्त, कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई
कोल्हापूर : दि .४/९/२४. गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ व अवैध धंदे यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांनी वेगवेगळी पोलीस पथके तयार करून अंमली पदार्थ विषयी माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार कृष्णात पिंगळे व अशोक पोवार यांना शिवाजीनगर पोलीस ठाणे हददीतील कबनूर ते पंचगंगा फॅक्टरीकडे जाणारे रोडवर दोन इसम हे गांजा विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील पोसई जालिंदर जाधव व इतर स्टाफ यांचेसह जाऊन छापा टाकला असता ०२ इसम हे बॅगेसह मिळून आले. त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नांवे १) नाथ पुषा माझी वय ३३ वर्षे रा. तांडरंग पोस्ट अंगुर ता. नुगड जिल्हा गजपती राज्य उडिसा व २) पिन्युएल डॅनियल रैत वय १९ वर्षे रा. सिकाबाडी पोस्ट संबलपूर ता. नुगड जिल्हा गजपती राज्य उडिसा असे सांगितले. त्या दोन इसमांकडे असलेल्या दोन बॅगेमध्ये किंमत रुपये ३,०५,८००/- रुपये किंमतीचा १४ किलो २४ ग्रॅम वजनाचा गांजा हा व ०२ मोबाईल हॅन्डसेट मिळून आले. त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, शमहेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक, निकेश खोटमोडे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक- जालिंदर जाधव व पोलीस पथक मधील पोलीस अंमलदार १) कृष्णात पिंगळे, संजय हुंबे, अशोक पवार, प्रकाश पाटील, सागर चौगले, आमित सर्जे, राजेश राठोड, महेश पाटील, राजू येडगे, शिवाजी मठपती व हंबीर अतिग्रे, महादेव कुराडे यांनी केली आहे.