गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग, सीमा तपासणी नाका इन्सुली कार्यालयाची अवैध मद्य वाहतुकीवर धडाकेबाज कारवाई...
गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर, सीमा तपासणी नाका इन्सुली, कार्यालयासमोर, संशयित वाहनांची तपासणी करीत असताना दि.04/09/2024 रोजी पहाटे 06.15 च्या सुमारास गोवा राज्यातून मुंबईच्या दिशेने जाणारे अशोक लेलँड सहाचाकी वाहन क्र. DD-01-F-9083 ची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीचे एकुण 700 बॉक्स मिळून आले. सदर प्रकरणी वाहन चालक- 1) कुंदन, वय 26 वर्षे, रा. धार, मध्यप्रदेश व 2) टोनी मोरोइएस, वय 48 वर्षे, रा.मडगाव, गोवा यांना ताब्यात घेउन गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्यामध्ये मद्यसाठ्याची किंमत रु.33,66,000/- व वाहनाची अं. किं.रु.17,00,000/- व एक विवो कंपनीचा मोबाईल अं.किं. रु.12,000/- असा एकुण अंदाजे रु.50,72,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला. सदर कारवाई मनोज शेवरे , अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शना खाली प्रदीप रास्कर, प्रभारी निरीक्षक, विवेक कदम, दुय्यम निरीक्षक, धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक, गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, दिपक वायदंडे, जवान, प्रसाद माळी जवान व रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक, जगन चव्हाण, जवान नि.वा.चालक यांनी केली. सदर घटनेचा तपास धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली हे करीत आहेत.