डॉ.सुजित मिणचेकर विजयी संकल्प मेळावा तिळवनी येथे मोठ्या उत्साहात संपन्न
साजणी :
हातकणंगले तालुक्यातील साजणी गावचे सुपुत्र प्रा.विशाल साजणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यसम्राट लाडके आमदार सुजित मिणचेकर यांचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून, कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील असंख्य आमदार प्रेमी उपस्थित राहून मिणचेकर यांना आमदारकी साठी आपण आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्वांनीच त्यांना विधानसभा लढवण्यासाठी धीर देत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आवाहन करत त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना मागील दहा वर्षाचा अनुभव घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख करत, सुजित मिणचेकर यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपल्यातील हेवे दावे बाजूला ठेवून एकमताने निर्णय घेऊन मिणचेकर यांना आमदार म्हणून निवडून आण्यासाठी प्रयत्न करूयात असे आवाहन यावेळी केले, मिणचेकर यांनी बोलताना निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करत कार्यकर्त्यांना सूचना व मार्गदर्शन करत आदेश दिले की "आज आणि आतापासून तुम्ही तयारीला लागले पाहिजे अवधी फार कमी आणि काम खूप मोठे आहे. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून नव्या उम्मेदिने कामाला लागा काहीही असो निर्णय कोणातही असुदे आपण विधानसभा लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले " 2024 च्या निवडणुकीत डॉ सुजित मिणचेकर यांच्या विजयी संकल्प मेळाव्या मध्ये विशाल साजणीकर यांनी देखील त्यांना विजयी प्रेरणा देत आमचा पक्ष सुजित मिणचेकर , आणि आमचा येणाऱ्या विधानसभेचा उमेदवार सुजित मिणचेकर असे आव्हान करुन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत व दृढ विश्वास दाखवत त्यांनी यापूर्वी केलेल्या विविध कार्याचा आढावा यावेळी उपस्थितां समोर मांडला आणि मिणचेकर यंदा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येणार आणि आम्ही तुम्हालाच निवडून आणणार असे आश्वासन यावेळी व्यक्त केले. यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून प्रत्येक गावातील डॉ.सुजित मिणचेकर , व डॉक्टर विशाल साजणीकर,प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थिती शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख- संजय चौगुले, आर पी आय खरात गट जिल्हा कार्याध्यक्ष- हर्षदकुमार कांबळे, खरात गट जिल्हा अध्यक्ष- आकाश कांबळे,यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
