आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांना समाजशील शिक्षकाने लावला लळा
मोहन सातपुते यांच्या सहज, निखळ ,आनंदी शिक्षणाने मुलांना पडली भुरळ!!
उजळाईवाडी :(तालुका करवीर)
शाळा, खडू, फळा, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यां हे आनंददायी शिक्षणातील अंतर्बाह्य उजळून निघालेली प्रबोधनाची विचारपीठ आहेत.विद्येच्या माहेर घरात सरस्वतीचे मंजुळ स्वर बोलले जातात.महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या ज्ञानदानाची क्रांतीकारी शिदोरी शाळेत उलगडली जाते.अभ्यासक्रमातील शिक्षकांनी विविधांगी शिकवलेले पुस्तकांतील धडे जीवनाला आकार देतात.आचार, विचार, सुसंस्कार, आणि परिसर यामुळे विद्यार्थ्याची सामाजिक जडणघडण होते. संविधानाच्या मूलभूत
हक् आणि अधिकाराने शिक्षण हे वाघिणीचे दूध पिणारी पिढी तयार होत आहे.प्रबोधनात्मक शिक्षण हे समाज उन्नतीचे माध्यम बनत आहे. आज सोशल मीडियामध्ये गुंतलेले पालक लहानग्याच्या हाती मोबाईल देऊन स्क्रीन टच वर मुलांना खेळवून ठेवत आहेत.यामुळे लहान मुलेही नेटकरीत गुंतली आहेत.
मुलेही देवाघरची फुले असतात. ती जीवनाचे रहस्य उलगडत असतात.आपल्या बोबड्या बोलण्यानं सर्वांना आपलंसं करत असतात.अश्या लहान मुलाना संस्कार गीते ,अभिनय गीते, बडबडगीते, आनंददायी शिक्षणातील प्रबोधनात्मक गीते शिकवणाऱ्या उजळाईवाडी तालुका करवीर येथील समाजशील शिक्षक मोहन गणपती सातपुते यांच्या चांगुलपणाच्या शिकवणीमुळे लहानग्या मुलांना त्यांनी भुरळ घातली आहे. त्यांच्या कौशल्येपूर्ण व अभिनयमय सादरीकरणमुळे बडबडगीतकार म्हणून लहानग्या मुलांच्या ह्रदयात त्यांनी स्थान मिळवले असून मुलाना त्यांच्या आनंददायी प्रार्थना परिपाठचा लळा लागला आहे. आनंददायी शिक्षणातून ते ज्ञानगंगोत्री घरोघरी पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम करत आहेत.
सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प - अगंणवाडी कार्यकर्ती प्रशिक्षण केंद्राकडे १२ वर्ष शिक्षक म्हणून काम पाहिले आहे. आदर्श जीवन शैली आणि सुसंवाद यामुळे हजारो विद्यार्थी, अगंणवाडी सेविका, मदतनीस घडल्या आहेत. त्यांच्या समाज मनातील कार्याची नेहमीच समाजाने दखल घेतली आहे.
शाळा बाह्य मुले, ऊस तोडणी कामगारांची, वीट भट्टी कामगारांची, असंघटित कामगारांच्या मुलांसाठी विविध उपक्रम राबवित असतो. युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य प्रतिबंध विभाग गोकुळ शिरगाव मार्फत अश्या मुलाना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रेरणादायी काम राहिले आहे.