प्रतिनिधी/अमित खांडेकर
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे होमगार्ड संघटनेच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त रुकडी होमगार्ड उपपथक यांचे वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जयश्री देसाई जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड ,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण ,होमगार्ड रूकडी उपपथकाचे प्रभारी अधिकारी नंदकुमार लोंढे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या रक्तदान शिबिराबरोबर वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम,जनजागृती रॅली यासारखे उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन लिपिक गौतम चव्हाण व सेक्शन लीडर अभिषेक गायकवाड यांनी केले होते. या रक्तदान शिबिरात होमगार्ड स्टाफ व पोलीस स्टाफ यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.तसेच इतर सर्व उपक्रमामध्ये सहभाग घेतला. रक्तदान केलेल्या व्यक्तींना प्रमाणपत्र व बॅग भेटवस्तू म्हणून देण्यात आली.