ज्ञानदीप विद्यालय शिरोलीच्या शुभश्री कांबळेने महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला
शिरोली, ता. हातकणंगले – दि. १ एप्रिल २०२५परफेक्ट पब्लिकेशन, कोल्हापूर संचलित महाराष्ट्र स्टेट टॅलेंट सर्च (MSTS) परीक्षेत ज्ञानदीप विद्यालय, शिरोली (पु.) च्या कु. शुभश्री शरद कांबळे हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शुभश्रीने या परीक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
शुभश्री ही ज्ञानदीप विद्यालय, शिरोली (पु.) येथे इयत्ता पहिलीत शिक्षण घेत असून तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशात मुख्याध्यापक श्री. प्रतापराव शिंदे, शिक्षक श्री. धर्मशील शिंगारे आणि शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
शुभश्रीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने संपूर्ण शाळेच्या तसेच गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.