महावितरणकडून बकाया वसुलीत यशस्वी ठरलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव
हेरले : ४ एप्रिल: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) विभागीय कार्यालय, जयसिंगपूर यांच्या वतीने हातकणंगले उपविभागातील बकाया वसुलीमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सन २०२४-२५ या कालावधीत उपविभागांतर्गत व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडील मार्च २०२५ अखेरची थकबाकी प्रभावीपणे वसूल केली. वीज ग्राहकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले, त्यामुळे हातकणंगले उपविभागाने ११४.३१% उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणच्या वतीने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास उपकार्यकारी अभियंता श्री. रविंद्र विलास पाटील आणि कार्यकारी अभियंता श्री. वैभव मोहन गोंदिल उपस्थित होते.
यासोबतच महावितरण शाखा कार्यालय हेरले येथील अभियंता श्री. संदीप कांबळे आणि संपूर्ण कर्मचारी वर्गाने या यशस्वी कामगिरीबद्दल साहेबांचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे महावितरणच्या यशात मोलाची भर पडली आहे.
सदर यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महावितरण शाखा कार्यालय हेरलेच्या टीमचे योगदानही उल्लेखनीय आहे. या यशस्वी कार्यात सहभागी असलेले कर्मचारी:
1. संदीप कांबळे (जुनिअर युनियन)
2. बाबुराव कांबळे (सिनिअर टेक्निशियन)
3. वसंत कवाडे (सिनिअर टेक्निशियन)
4. संतोष जाधव (सिनिअर टेक्निशियन)
5. अशोक काळे (विद्युत सहायक)
6. अक्षय माळी (विद्युत सहायक)
7. तय्यबअली मुल्ला (बाह्य स्त्रोत टेक्निशियन)
8. वैभव अपराध (बाह्य स्त्रोत टेक्निशियन)
9. विनायक सुतार (बाह्य स्त्रोत टेक्निशियन)
10. पृथ्वीराज जाधव (शिकाऊ उमेदवार)
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या या कार्याची प्रशंसा करत पुढील काळातही अशीच निष्ठा आणि सचोटी कायम ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला. वीज ग्राहकांनी वेळेवर देयक भरून सहकार्य केल्याने ही उद्दिष्टपूर्ती शक्य झाली, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.