कोल्हापूर जिल्हयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भव्य मेळावा
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर येथे रविवार दि.५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास लिपीक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, चर्तुथ कर्मचारी उपस्थित राहण्याचे आव्हान शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाो पाटील, उपाध्यक्ष श्रीधर गोंधळी, मारुती मुगुडकर, संजय कांबळे, कार्याध्यक्ष संयज पाटील, अशोक पाटील, उमेश माळी, सचिव मनोहर जाधव, सहसचिव राजशेख सुर्वे, सचिन पाटील, हिशोब तपासणीस विक्रम शेलार, महिला प्रतिनिधी सुनिता बीडकर, तसेच सदस्य शानाजी माने, तातोबा गोते, रवी पाटील, अशोक पाटील, सागर पोवार, महेश कुऱ्हाडे, अनिल हालकर्णीकर, आनंदा जाडगे, शिवाजी पाटील, वैभव शहा, वसंत पाटील, युवराज पाटील, केशव गुरव, बजरंग देसाई, रामदास पाटील, हेमंत पाटील, रामदास बुरुंगळे, अमर सदलगे इत्यादी पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
यामध्ये २४ वर्षानंतर देण्यात आलेली (१) आश्वासित प्रगत योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करावी. (२) १०-२०-३० आश्वासित प्रगत योजना लागू करावी. (३) चर्तुथश्रेणी कर्मचारी भरती बंदी उठवून भरती सुरु करावी. (४) चर्तुथश्रेणी कर्मचाऱ्याची गणवेश भत्ता व धुलाई भत्ता वेतनातून आदा करणेत यावा. (५) तसेच कार्यालयीन स्तरावर येणाऱ्या अडचणीवर चर्चा करणे. (६) वरिठ लिपीक प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथपाल नाईक यांना २४ वर्षानंतरच्या आश्वासित प्रगत योजनेचा लाभ देणेबाबत येणाऱ्या अडचणीवर चर्चा करणे. या व इतर अनेक विषयावर चर्चा होणार आहे. तरी जिल्हयातील सर्व अनुदानित, टप्पा अनुदानित, विना अनुदानित, शाळेतील सर्व शिक्षकेतर बांधवाने उपस्थितीत राहणेचे आव्हान करणेत आलेले आहे.