आमदार अमल महाडिक यांची नागपूर येथे मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी चर्चा
नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार अमल महाडिक यांनी नवनिर्वाचित मंत्री
राधाकृष्ण विखे-पाटील, जयकुमार गोरे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले,गणेश नाईक यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचीही भेट झाली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकासाभिमुख निर्णय मंत्रिमंडळाकडून घेतले जातील याची खात्री आहे.